सोनू नायक
…अल्को-स्पिरिच्युअल कौन्सेलर
निनावीपणा हे आमचे मूळ तत्त्व आहे.
अनेक वर्षांच्या संशोधनानंतर, डब्ल्यूएचओ आणि एएमएने मद्यपाश हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा किलर आजार म्हणून घोषित केला. मद्यपाश बारा होऊ शकत नाही, परंतु त्यावर उपचार केले जाऊ शकतात. मद्यपाश मुक्तीचे विविध मार्ग आहेत परंतु अल्को-स्पिरिच्युअल मार्गाने मद्यपाशापासून मुक्तता अधिक सहजपणे शक्य आहे.
मद्यपाश.. शाप किंवा पाप नाही किंवा पूर्वजन्म कर्म नाही. मद्यपाश हा एक आजार आहे.
मद्यपाश
मद्यपान करणाऱ्यापैकी सुमारे 12% व्यक्ती मद्यसक्त होतात.
तीन स्तरीय आजार: शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक
शारीरिक प्रतिक्रिया
यामध्ये शरीराकडून मद्याला मिळणाऱ्या प्रतिक्रियेचा समावेश होतो. ज्यामध्ये शारीरिक तृष्णा आणि मद्यमुक्त झाल्यावर होणारी शारीरिक लक्षणे समाविष्ट असू शकतात.
मद्यपाशाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला कोणत्या प्रकारची ऍलर्जी होते हे “आसक्तीची अपूर्व घटना” म्हणून स्पष्ट केली जाऊ शकते. डॉ. विल्यम डी. सिल्कवर्थ, बिग बुक ऑफ अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये, स्पष्ट करतात, “आम्हाला असे वाटते आणि काही वर्षांपूर्वी असे सुचवले होते की, या मद्यासक्तांवर मद्याचा परिणाम हा ऍलर्जीचे एक प्रकटीकरण आहे; की अतिरिक्त मद्याची ओढ ही या वर्गापुरती मर्यादित आहे. संयत मद्यपान करणाऱ्या व्यक्तीमध्ये ही कधीच आढळत नाही. हे ऍलर्जीक मद्यासक्त कधीही कोणत्याही स्वरूपात सुरक्षितपणे मद्यपान करू शकत नाहीत.
ही आसक्ती व्यसनाच्या अगदी सुरुवातीच्या काळात, लक्षात येण्यासारख्या शारीरिक तृष्णेच्या लक्षणांपूर्वीच विकसित होते.
मनाची अनाकलनीय ओढ
अनाकलनीय ओढ : म्हणजे मद्यासक्ताला, मद्यपान हानिकारक आहे हे माहीत असतानाही, प्रचंड आणि तीव्र अशी मद्यपानाची इच्छा होणे
अनियंत्रित विचारचक्र : ही ओढ मद्यासक्तच्या विचारांवर कब्जा करू शकते, ज्यामुळे त्यांना मद्यपान न करण्याची ठोस कारणे असतानाही, मद्यपान करण्याची अनिवार इच्छा टाळता येत नाही.
धारणा विकृती : मद्यपींची धारणा विकृत होऊ शकते, ज्यामुळे त्यांना असे वाटते की मद्य हा त्यांच्या सर्व समस्यांवर एकमेव उपाय आहे किंवा मद्यपानाचे विघातक परिणाम होत असूनही त्यांना वाटते की ते प्रमाणात मद्यपान करू शकतात.
प्रभावी मानसिक संरक्षणाची कमतरता : एए साहित्यात मद्यपी व्यक्तीविषयी म्हटले आहे की, “पहिला घोट टाळण्यासाठी प्रभावी मानसिक संरक्षण नसते.” इतकी मद्यपानाची मानसिक ओढ तीव्र असते.
अध्यात्मिक दिवाळखोरी
AA “बिग बुक” मध्ये वर्णन केल्याप्रमाणे, अध्यात्मिक दिवाळखोरी म्हणजे रिक्तपणाची भावना, आकलनाचा अभाव आणि स्वतःपासून व उच्च शक्तीपासून विभक्त होणे होय.
लक्षात न आलेले मानसिक आघात, निराकरण न झालेल्या भावनिक समस्या किंवा आध्यात्मिक आधार नसल्यामुळे उद्भवते, ज्यामुळे मद्यपि मद्यपानाद्वारे तात्पुरती सुटका मिळविण्याचा प्रयत्न करतो.
मद्यासक्ती हे या अंतःकरणातील अध्यात्मिक शून्यतेचे लक्षण म्हणून पाहिले जाऊ शकते. आणि ही शून्यता भरून काढण्यासाठी व निरर्थकतेच्या भावनांपासून मुक्त होण्यासाठी मद्यपी व्यक्ती दारूकडे वळते.
अल्कोहोलिक्स अनॉनिमस बिग बुक मध्ये अध्यात्मिक दिवाळखोरीची लक्षणे म्हणून, हरवल्यासारखे वाटणे, हेतू नसणे किंवा इतरांशी संबंध नसणे यांची नोंद करते.
अगदी खालचा तळ गाठणे
अल्कोहोलिक्स एनोनिमस (एए) अनुसार, ” अगदी खालचा तळ (रॉक बॉटम)” हा त्या बिंदूला सूचित करतो, जिथे सक्रिय मद्यपानामुळे मद्यपीडिताचे जीवन इतके असह्य होते की, ते शेवटी मद्यमुक्तीसाठी प्रवृत्त होतात. विशेषतः लक्षणीय नुकसान अनुभवल्यानंतर.
हे परिणाम बाह्य व अंतर्गत असे आहेत :
1) बाह्य : नोकरी गमावणे | अति मद्यपान करणे किंवा अति मद्यपानामुळे गंभीर आजार होऊन रुग्णालयात दाखल होणे | बेघर होणे | जवळचे नातेसंबंध गमावणे | आर्थिकदृष्ट्या निराधार होणे | अटक होणे यासारखे कायदेशीर परिणाम इ.
2) अंतर्गत : दारूवर अवलंबून राहण्याची बोचरी जाणीव आणि जीवनाकडून काहीतरी जास्तीची अपेक्षा | आपल्या सभोवतालच्या लोकांपासून तुटल्यासारखे वाटणे | प्रियजनांसाठी पूर्णपणे उपलब्ध राहण्यास असमर्थ असणे | दारू पिल्यामुळे स्वतःची प्रतिमा खराब झाल्याची किंवा निराशेची जाणीव इ.
मद्यपाश
जगातील सर्वात वेगाने वाढणारा प्राणघातक आजार

कृपया AMA, WHO, AA आणि संबंधित संस्था/संघटनांच्या घोषणांद्वारे
वेळोवेळी संबंधित माहितीचा संदर्भ घ्यावा.
मद्यपाश... एक आजार म्हणून घोषित
डॉक्टरांची सर्वात मोठी संघटना – अमेरिकन मेडिकल असोसिएशन (AMA) – ने 1956 मध्ये मद्यपाश हा एक आजार असल्याचे घोषित केले.
1991 मध्ये, AMA ने मनोरुग्णता आणि वैद्यकीय या दोन्ही विभागांतर्गत रोगांच्या आंतरराष्ट्रीय वर्गीकरणाद्वारे मद्यपाशाच्या दुहेरी वर्गीकरणाला पुढे मान्यता दिली.
जागतिक आरोग्य संघटना (WHO) मद्यासक्तीला एक आजार म्हणून ओळखते. मद्यपान 200 हून अधिक आरोग्यविषयक परिणामांशी जोडलेले आहे, ज्यात यकृताचे आजार, रस्त्यावरील दुखापत, हिंसाचार, कर्करोग, हृदयरोग, आत्महत्या, क्षयरोग आणि एच आई व्ही / ए आय डी एस यांचा समावेश आहे.
मद्यपाश- धूर्त, कावेबाज, प्रबळ आजार
अल्कोहोलिक्स अनॉनिमस – AA (स्था. 1935) अनुसार…
मद्यपाशाची कोणतीही औपचारिक “ए.ए.” व्याख्या नसली तरी, आमच्यापैकी बहुतेक सदस्यांचा असा अनुभव आहे की, आमच्यापैकी बहुतेकांसाठी, मद्यपाशाचे एक शारीरिक सक्ती म्हणून वर्णन केले जाऊ शकते, ज्यामध्ये अनाकलनीय मानसिक ओढ देखील समाविष्ट आहे.
आमच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की, सर्वसाधारण वर्तनाच्या सर्व नियमांचे उल्लंघन करून, आम्हाला नियंत्रण करता येणार नाही अशा, क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात दारू पिण्याची एक विशिष्ट शारीरिक तृष्णा होती. आम्हाला दारूची असामान्य इच्छा होतीच, पण आम्ही अनेकदा सर्वात अयोग्य वेळीही तिच्या अधीन होतो. आम्हाला कधी (किंवा कसे) दारू पिणे थांबवायचे हे माहित नव्हते. बऱ्याचदा आम्हाला केव्हा सुरुवात करू नये हे कळण्या इतकी पुरेशी जाणीवच नव्हती.
मद्यपाश... एक कौटुंबिक आजार
अल्कोहोलिक्स अॅनिनिमस मद्यपाशाला कौटुंबिक आजार मानते. कारण एखाद्या व्यक्तीचे मद्यपानाचे व्यसन संपूर्ण कुटुंब व्यवस्थेवर खोलवर परिणाम करते, ज्यामुळे समस्यांचा एक प्रतिद्वंद्वी परिणाम निर्माण होतो. जो केवळ मद्यपान करणाऱ्या व्यक्तीवरच नव्हे तर संबंधित प्रत्येकावर परिणाम करतो.
मद्यपाशामुळे कुटुंबात तणावपूर्ण वातावरण निर्माण होते, ज्यामुळे सर्व सदस्यांसाठी संघर्ष, तणावपूर्ण संबंध आणि भावनिक आव्हाने निर्माण होतात. मद्यपींच्या मुलांमध्ये मादक पदार्थांच्या गैरवापराच्या समस्या, वर्तणुकीच्या समस्या आणि मानसिक आरोग्याच्या समस्या विकसित होण्याचा धोका जास्त असतो.
दीर्घकालीन मद्यमुक्तीसाठी निरोगी कौटुंबिक वातावरण अत्यंत महत्त्वाचे आहे हे ओळखून, एए मद्यपी व्यक्तीच्या मद्यमुक्तीमध्ये कुटुंबाच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित करते.
एकट्याने शक्य नाही... पण एकमेकांसोबत शक्य आहे.
(कौन्सेलिंग | कोर्सेस | कॅम्प्स)
तज्ञ सेवा : अल्को-स्पिरिच्युअल इंट्रोस्पीक्शन, इच्छा व्यवस्थापन, ध्यान आणि कपल स्पेशल

मद्यपीडित आणि मद्यपीडितांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी समुपदेशन.
वैयक्तिक सेशन पूर्ण गोपनीयतेने आयोजित केली जातात. मुद्देसूद संभाषण. मनापासून संवाद. स्पष्ट दृष्टिकोन.

7 लेव्हल अल्को-स्पिरिच्युअल रिकव्हरी प्रोग्रॅम
कृती हा जादूई शब्द आहे | सहज करण्यायोग्य कृती | ग्रुप थेरपी | सेल्फ-हीलिंग थेरपी. मद्यपीडित आणि मद्यपीडित कुटुंबातील सदस्यांसाठी स्वतंत्र सेशनचे आयोजन

मद्यमुक्तीच्या मार्गावर चालणाऱ्या मद्यपीडितांसाठी 2 रात्री 3 दिवसांचा अल्को-स्पिरिच्युअल कॅम्प. ट्रेनिंग + एन्जॉयमेंट + मद्यपीडित आणि मद्यपीडितां कुटुंबातील सदस्य, मित्र आणि हितचिंतक सहभागी होऊ शकतात.
माझी कारकीर्द
वर्षांचा कामाचा
अनुभव
अनुभव
0
+
रिकव्हरिंग
मद्यपीडित
मद्यपीडित
0
+
रिकव्हरिंग
परिवार
परिवार
0
+
एकट्याने शक्य नाही... पण एकमेकांसोबत शक्य आहे.
मी एक नॉन-फिक्शन लेखक आहे. मी वास्तव आणि सत्यावर पुस्तके लिहितो.
"मी इझम अँड अल्कोहोल" हे फक्त एक पुस्तक नाही,
ही एक विजयी कहाणी आहे कुमार एक्सची ... एक मद्यपीडित ज्याचे रूपांतर एका मद्यमुक्त व्यक्तीमध्ये झाले.
“मी इझम अँड अल्कोहोल” हे ट्रू लाईफ बुक 25 नोव्हेंबर 2025 पासून अमेझॉन.कॉम वर इंग्रजी, मराठी आणि हिंदी या तीन भाषांमध्ये जागतिक स्तरावर उपलब्ध.
तुम्ही तुमची प्रत फक्त 349 मध्ये आत्ताच प्री-बुक करू शकता.
द अल्को-स्पिरिच्युअल शो

अल्को-स्पिरिच्युअल शोच्या सादरीकरणामागील उद्देश हे चार घटक पुनर्संचयित करणे हाआहे
वैयक्तिक विवेक | कौटुंबिक एकता | सामाजिक सलोखा | राष्ट्रीय एकात्मता
सोनू नायक प्रस्तुत
द अल्को-स्पिरिच्युअल शो
नोंदवलेल्या निरीक्षणानुसार, मद्यपाश हा जगातील तिसरा सर्वात वेगाने वाढणारा आणि सर्वात मोठा प्राणघातक आजार आहे.
या शोमध्ये तुम्हाला अचूक तथ्ये, सत्य आणि मद्यपीडेपासून मुक्ततेचा मार्ग कळेल..
हा शो प्रत्येकासाठी आवश्यक आहे. तुम्ही मद्यपी असाल किंवा नसाल, हा आजार तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींना कधी आणि कसा लागू शकतो हे कोणीही सांगू शकत नाही.
हा शो मद्यपाशाच्या विनाशकारी स्वरूपासह मद्यमुक्तीचे व्यावहारिक उपाय दर्शवतो. हा शो सुमधूर गाणी, स्पंदित कविता, थक्क करणाऱ्या कथा आणि ज्ञानवर्धक अनुभवांनी सजला आहे.
अल्प परिचय
सोनू नायक
मी सोनू नायक
आणि मी तुमचा स्पिरिच्युअल कौंसिलर आहे.
मी एक हाय ऑनर शास्त्रीय संगीत अध्यापक आहे. मी एक टॉप रँकर सुगम सिंगर. १९३२ मध्ये स्थापन झालेल्या भारत सरकार मान्य शैक्षणिक संस्थेचा मी एक सेंटर डायरेक्टर आहे. मी मानसशास्त्राचा विद्यार्थी आहे तसेच स्पिरिच्युअल सायन्सेस हाही माझा अभ्यासाचा विषय आहे.
पूर्वी, व्यवसायाने मी ग्राफिक डिझायनर होतो. मी व्होकल म्युझिक टीचर होतो. मी एक प्रोफेशनल सिंगर होतो. मी इव्हेंट डिझायनर होतो.
आज, ज्या क्षेत्रात मी काम करणे अपेक्षित आहे त्या क्षेत्रात मी कार्यरत. मी एक लेखक आहे. मी एक वक्ता आहे. मी एक मार्गदर्शक आहे. मी आध्यात्मिक सेवा क्षेत्राला माझे सेवाक्षेत्र म्हणून निवडले, कारण मला ते माझे पाचारण असे जाणवले.
का ?
तुम्हाला माहिती आहे का? माझ्या आयुष्यात मी भोगलेल्या दुःखाची खरी कहाणी सांगणे माझ्यासाठी खूप लाजिरवाणे होते. कुटुंबातील एक सदस्य मद्यपी आहे हे उघडपणे कोण सांगू इच्छिते?
माझ्यातही ते धाडस नव्हते. पण फॅमिली इज फर्स्ट, माझा विश्वास आहे. म्हणून मला हे ठरवायचे होते की माझ्या कुटुंबातील मद्यपी सदस्याचा द्वेष करायचा आणि त्याला सोडून द्यायचे; की त्याला दारूपासून मुक्त होण्यास मदत करायची..
मी दुसरा पर्याय निवडला. मी खूप शोधले. मी मेहनत केली. माझ्या प्रिय कुटुंबातील सदस्याचे नेमके काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी मी प्रयत्न केले. सत्य जाणून घेण्यासाठी मी माझे मन मोकळे ठेवले. मी स्वतःला ज्ञानाच्या मार्गावर चालत ठेवले. पुढे जात राहण्यासाठी खूप संयम, सहनशीलता आणि प्रेमाची आवश्यकता होती.
आणि तो दिवस आला, ज्याने मला साक्षात्काराचा प्रकाश दिला, माझ्या जीवनाचे उद्देश्य दिले आणि मला, माझ्या कुटुंबाला आणि माझ्या कुटुंबातील मद्यपी सदस्याला जी मद्यपीडा सोसावी लागत होती, त्यामागील सर्व गोष्टींचा दैवी उद्देश सांगितला.
आता मला माझ्या आयुष्याचा दैवी हेतू पूर्ण करायचा होता. मी स्वतःवर काम करू लागलो आणि इतरांना मदत करू लागलो.
कसे?
एकट्याने शक्य नाही... पण एकमेकांसोबत शक्य आहे.
सेवांसाठी संपर्क (सकाळी 11 ते दुपारी 5)
अल्को-स्पिरिच्युअल कौन्सेलिंग । अल्को-स्पिरिच्युअल कोर्सेस । अल्को-स्पिरिच्युअल कॅम्प ।
अल्को-स्पिरिच्युअल बुक्स । अल्को-स्पिरिच्युअल शो
📞कॉल : +91 8983016348
सुखायन कम्युनिटी, सुरभी अपार्टमेंट, कलानगर, नाशिक ४२२००९ महाराष्ट्र भारत.